काेल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील सरपिराजी तलावास पाणी पुरवठा करणाऱ्या जांभुळखोरा येथून येणाऱ्या ओढ्यामधून मृत वासरू वाहून आले होते .ते पुढे वाहत जाऊन तलावामध्ये प्रदुषण होऊ नये म्हणून ओढ्यातून बाहेर ओढून काढण्यात आले. गेल्या आठवड्यात या ओढ्याची शिवभक्तांनी स्वच्छता केली होती व यामधून तब्बल तीन ट्रॉली कचरा बाहेर काढण्यात आला होता .
पावसाचे प्रमाण वाढल्याने तलाव काठोकाठ भरला आहे. तलावाचे पाणी शुद्धीकरण करून मुरगूड शहरात पिण्यासाठी वापरण्यात येते. मेलेल्या जनावरांचे असे वाहून येणे ही चिंतेची बाब आहे असे मत पर्यावरणवादी नागरिकांनी बोलून दाखवले . ओढा साफ करणाऱ्या तरुणांचे त्यांनी मनापासून आभार मानले व अभिनंदन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त सर्जेराव भाट, श्रावण कळंद्रे प्रीतेश साळुंखे, ओंकार पोतदार, रवी हळदकर, पृथ्वी चव्हाण यांनी स्वयंसेवक म्हणून योगदान दिले.नगरपालिकेचे कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.
-------------------------