कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मंडलिक राष्ट्रीय (SAI) कुस्ती संकुल, मुरगुड (कोल्हापूर) ची धाडसी मल्ल पै. तन्वी गुंडेश मगदूम ची याँग टाऊ (व्हिएतनाम) येथे झालेल्या २३ वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकी कामगिरी. उझबेकिस्थान, किर्गिस्थान, मंगोलिया येथील मल्लाना गुणाधिक्याने पराभूत करून, अंतिम फेरीत कझाकीस्थानच्या व्हीकटोरिया कुशीनोव्हा बरोबर कडवी झुंज दिली.आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादासाहेब लवटे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.
माजी खासदार संजय मंडलिक , विरेंद्र मंडलिक, वस्ताद सुखदेव येरुडकर, अण्णासाे थोरवत ,चंद्रकांत चव्हाण, डॉ.प्रशांत अथणी, सागर देसाई, दयानंद खतकर ,जय शिवराय शिक्षण संस्था,मुरगूड नगरपरिषद यांचे प्रोत्साहन लाभले.
--------------------------