वन हक्क दावे मंजूर करावेत

Kolhapur news
By -

 

           




             कोल्हापूर न्यूज / हेरले प्रतिनिधी


वन हक्क दावे मंजूर करावेत तसेच कसत असलेल्या जमिनी काढून न घेणेबाबत लेखी निवेदन हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांना मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथील महेंद्र नरसिंगा कांबरे यांनी दिले आहे.


  लेखी निवेदनातील आशय असा की, महाराष्ट्रामध्ये वनविभागाच्या सरकारी फॉरेस्ट जागेवरती शेतकरी वडिलोपार्जीत अंदाजे ६० ते ७० वर्षे शेतजमीन कसत व मशागत करत आहेत, पिढ्यानिपिढ्या जंगलात तसेच फॉरेस्ट जागेवरती वन निवासी नागरिकांवर अन्यायकारक निर्णय सरकराने घेतले आहेत. त्यामुळे शेतकरी, पशुपालक आणि वननिवासी नागरिकांना मोठ्या पप्रमाणावर आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु नवीन नियमानुसारा वनहक्क दावे करणेचे नियम २०१२ ते २०१५ च्या जिआर नुसार महाराष्ट्रातील तसेच जिल्ह्यातील वनदावे करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी कब्जा वहिवाटीत आहेत तसेच वनहक्काचे दावे महाराष्ट्रात तसेच जिल्ह्यामध्ये प्रलंबित असून वन अधिकारी जमिनी शेतकऱ्यांच्याकडून काढून घेत आहेत त्यांचा नाहक त्रास वनविभागाकडून शेतकऱ्यांना होत आहे.


   आपणास विनंती करतो कि पूर्ण महाराष्ट्रामध्ये व जिल्ह्यामध्ये वनहक्क दावे प्रलंबित्त असून  त्या स्तिथी मध्ये शेतकऱ्यांच्याकडून जमिनी काढून न घेता त्या कसण्यासाठी जमिनी शेतकऱ्यांना मिळाव्यात. तसेच त्या जमिनी वरती कोणत्याही प्रकारचे बांधकाम न करता फक्त शेतकऱ्यांनी कसून खावे तसेच महाराष्ट्र वन हक्क समितीने व आपण संसदेत प्रस्ताव मांडून महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती केली आहे.

         

              ------------------