वागेश्वरी मठात श्रावण महिन्यानिमित्त शिविभक्तांकडून स्वच्छता मोहीम.

Kolhapur news
By -

         



             कोल्हापूर न्यूज नेटवर्क   

चिमगाव येथील वागेश्वरी मठ तथा चिमाबाई मंदिर येथे   श्रावण महिन्या निमित्त  शिवभक्तांकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली .दरवर्षी येथे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी मोठी गर्दी असते. त्यानिमित्त श्रावण महिना सुरू  होण्याआधी मंदिर व परिसरात स्वच्छता करण्यात आली. 


परिसरातील भाविक भक्तांच्या कडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत स्वच्छता अभियान  सुरू होते. मुरगूड येथील शिवभक्त व स्वयंसेवकांनी यासाठी परिश्रम घेतले. मंदिर परिसर मार्गावरील अनावश्यक झाडी झुडूपे वाढली होती . ती सर्व काढून टाकली व भाविकांसाठी स्वच्छ प्रांगण तयार केले. शिवाय ठीकठिकाणी पडलेल्या प्लॅस्टिक बाटल्या, रबर टायर्स  इत्यादी कचऱ्याची शिवभक्तांनी विल्हेवाट लावली . शेवाळसुध्दा काढले. 


     स्वच्छता मोहिमेत भाग घेणारे शिवभक्त स्वयंसेवक  याप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, तानाजी भराडे, आनंदा रामाने, शिवाजी चौगले, अमोल मेटकर, प्रफुल कांबळे, जगदीश गुरव यावेळी वागेश्वरी मठ चिमगांव पुजारी उपस्थितीत होते.

 


  


           --------------------------