विरोधकांनी सुद्धा विश्वास दाखवावा असा विकासपुरुष देवाभाऊ.

Kolhapur news
By -

 

            


     कोल्हापूर न्यूज   /  वि. रा.भोसले


     देवाभाऊ उर्फ चाणक्य ,उर्फ अणाजी पंत उर्फ विकासपुरुष,उर्फ महाराष्ट्र नायक उर्फ अजात शत्रू देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस महाराष्ट्रभर अत्यंत साधेपणाने संपन्न झाला. त्यांना आमच्याही मनःपूर्वक शुभेच्छा.


    देवेंद्रजींच्या  इमेज नुसार त्यांचा वाढदिवस सर्व प्रसारमाध्यमातून अवाढव्य असा साजरा व्हायला पाहिजे होता.तसा तो  झाला नाही.त्यामुळेच एक वेगळा संदेश केवळ महाराष्ट्राला नव्हे तर देशभरातील नेत्यांना गेला आहे.होय अगदी रमी खेळणाऱ्यांनासुद्धा. विधानभवन परिसरात व रस्त्यावर मारामारी करणाऱ्यांना आणि गळा फाडून अर्वाच्च घोषणा देणाऱ्यांना सुध्दा.दरवर्षी येणारा वाढदिवस हा म्हातारपणाकडे नेत असतो हे माहीत असूनही युवकांचे स्फूर्तीस्थान म्हणून नेत्यांच्या मोठमोठ्या जाहिराती लागत असतात. त्यांना सुध्दा.देवद्रजींचे तसले कांहीं नाही.त्यांच्या हजारो अनुयायांनी जागोजागी रक्तदान शिबिरे घेतली पण त्याची त्यांनी फारशी जाहिरातही केली नाही.तसे देवेंद्रजीनीच त्यांना सांगितले होते.


    विशेष म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने विरोधकांनी सुद्धा त्यांच्यावर स्तुति सुमने उधळली. त्यांना आणाजीपंत असे संबोधणाऱ्यांचा पण यात समावेश होता.कोणी वंदा कोणी निंदा असे म्हणत देवेंद्रजी महाराष्ट्राचा विकास ध्वज घेऊन नाका समोर चालले आहेत.


    विधानसभेत असो की पत्रकार परिषदेत असो त्यांची जीभ कधी कोठे घसरली नाही.यांचा अर्थ त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर दिले नाही असे नाही.ज्याला शालुतुन ... म्हणतात असे हलके धक्के त्यांनी जरूर दिले. ते समजायला विरोधकांना तीन दिवस गेले.जयंतराव ,उद्धव,राज , येवढेच नव्हे तर आपल्या पक्षातील नेत्यांना सुध्दा त्यांनी योग्य दिशा दाखवली आहे.


     शक्तीपीठ ,मराठा आंदोलन,मराठवाडा विकास,गडचिरोली पोलाद प्रकल्प,शेती साठी ए आय तंत्रज्ञान (कृत्रिम बुद्धिमत्ता) हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहेत.विरोधकांनी त्यावर सुद्धा जोरदार हल्ले केले. मिशन म्हणून नव्हे तर मंत्र्यांच्या कमिशन साठी हे ड्रीम प्रकल्प आहेत अशीही टीका झाली.


     या टीकेला त्यांनी समर्पक उत्तर दिले. अफाट वाढत्या लोकसंख्येबरोबर वाढणारी बेरोजगारी कमी करायची असेल तर मोठे प्रकल्प हाती घ्यावेच लागतील. समृध्दी महामार्ग हा त्यातीलच एक होता. दगड आणि फुले यांचा वर्षाव समान मानायचा असा उपदेश देणाऱ्या तुकोबारायांचा आदर्श ठेऊन देवेद्रांनी आषाढी च्या पूजेत पांडुरंगाला महाराष्ट्राच्या विकासाचे साकडे घातले.


    पांडुरंगाने सुद्धा तथास्तु म्हंटले असावे.म्हणून कांहीं आनंददायी राजकीय घडामोडींचा श्रावण सुरू होतोय असे दिसते.खरं तर महाराष्ट्राचा गाडा हाकलेल्या शरद पवार सारख्यांना सुध्दा हे सगळे माहिती आहे. म्हणूनच ते देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करतात.स्वतःचा कसलाही उद्योग न ठेवता महाराष्ट्राच्या विकासाचाच उद्योग करणाऱ्या देवा भाऊंना पुनश्च हार्दिक शुभेच्छा.


                    जय महाराष्ट्र.


          ----------------------------