कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा. या मागणीसाठी आज साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईला, इंडिया आघाडी आणि शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीन साकडे घालण्यात आले. शक्तिपीठ महामार्ग झाल्यास कोल्हापूर शहर आणि परिसराला महापुराचा सर्वात मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे हा महामार्ग विकासाकडे नाही तर विनाशाकडे नेणारा आहे. म्हणून हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घालण्यात आले. यावेळी अंबाबाई मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा. अशी एक मुखाने मागणी केली.
शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख रवि इंगवले, राजू लाटकर, - आर के पोवार, सचिन चव्हाण, व्यंकाप्पा भोसले, रघु कांबळे, अनिल घाटगे, प्रकाश पाटील, तौपीक मुल्लाणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित पोवार, बाबासो चौगले, शशिकांत पाटील, आदिसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
----------------------------