कागलच्या सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक पतपेढी अध्यक्षपदी प्रदीप पाटील तर उपाध्यक्षपदी विठ्ठल पाटील यांची निवड

Kolhapur news
By -

              


       कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   कागल येथील सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी प्रदीप बुधाळे-पाटील व उपाध्यक्षपदी विठ्ठल पाटील यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सहकार अधिकारी एन. ए. माने होते.


      अध्यक्षपदासाठी प्रदीप बुधाळे-पाटील यांचे नाव मावळते अध्यक्ष नेताजी कमळकर यांनी सुचविले. त्यास संचालक बाळासाहेब तांबेकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी विठ्ठल पाटील यांचे नाव मावळते उपाध्यक्ष बाळू खामकर यांनी सुचविले, त्यास संचालक किशोर जाधव यांनी अनुमोदन दिले. 



निवडीनंतर शिक्षक नेते जिल्हा परिषद सोसायटी अध्यक्ष सुनील पाटील, शिक्षक बँक संचालक बाळासाहेब निंबाळकर, सुकाणु समिती सदस्य व इतर मान्यवरांचे हस्ते सत्कार करणेत आला. यावेळी संचालक पांडुरंग पाटील, जितेंद्र कुंभार, तुकाराम इंगवले, रमेश कदम, हरिश्चंद्र साळोखे, आनंदा कांबळे, अनिल डवरी, वैशाली भारमल, रोहिणी लोकरे यांनी मनोगत व्यक्त केले.


    ---------------------------