कोल्हापूर न्यूज नेटवर्क
"विद्यार्थ्यांच्या लेखनगुणांना प्रेरणा मिळण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणजे महाविद्यालयाचे नियतकालिक होय." असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.निरंजन कुलकर्णी यांनी केले.
हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाच्या पसायदान या नियतकालिकाच्या प्रकाशन समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पसायदानचे विभागीय संपादक प्रा.रमेश पाटील यांनी स्वागत केले.पसायदान वार्षिक नियतकालिकाचे संपादक प्रा.डॉ.दिगंबर कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.प्राचार्य डॉ.निरंजन कुलकर्णी व मान्यवरांच्याहस्ते पसायदान नियतकालिकाचे प्रकाशन झाले.प्रा.रवींद्र पाटील यांची ज्युनिअर विभागाच्या पर्यवेक्षकपदी निवड झाल्याबद्दल, प्रा.डॉ.अमर कांबळे यांची रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी येथे सचिवपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.निरंजन कुलकर्णी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
पसायदानचे उपसंपादक प्रा.सुहास इनामदार,विभागीय संपादक प्रा.रवींद्र पाटील, प्रा.डॉ.मोहन सावंत,प्रा.रवींद्र पडवळे,प्रा.निळकंठ चक्रधारी,प्रा.डॉ.वंदना तांदळे,प्रा.प्रवीण गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यालयीन अधीक्षक रायगोंडा मुधोळे,प्रा.डॉ.आप्पासाहेब शेळके,प्रा.डॉ.अशोक जाधव,प्रा.डॉ.नामदेव खवरे,प्रा.डॉ.अमर कांबळे,प्रा.डॉ.मल्हारी सुरवसे,प्रा.डॉ.सुनिता तेलसिंगे,प्रा.डॉ.बालाजी कांबळे,प्रा.शहाजी गडदे आदी उपस्थित होते.प्रा.डॉ.संघमित्रा सर्वदे यांनी सूत्रसंचालन केले प्रा.संदीप लवटे यांनी आभार मानले.
हातकणंगले- येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाच्या पसायदान या नियतकालिकाचे प्रकाशन करताना प्राचार्य डॉ.निरंजन कुलकर्णी, प्रा.डॉ.दिगंबर कुलकर्णी व मान्यवर