सदगुरु बाळूमामा देवस्थानच्या कार्याध्यक्षपदी लक्ष्मण बाबुराव होडगे यांची निवड

Kolhapur news
By -

  

           



         कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठे देवस्थान म्हणून आदमापूरचे श्री क्षेत्र बाळूमामा देवस्थान प्रसिद्ध आहे.येथील सदगुरू बाळूमामा देवालयाच्या कार्याध्यक्ष पदी श्री लक्ष्मण बाबुराव होडगे यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.



 होडगे यांनी भारतीय सैन्यदलाच्या बीएसएफ मध्ये 17 वर्षे सेवा केली. त्यानंतर 1998 पासून 2025 पर्यंत 27  वर्षे अखंडपणे बाळूमामा मंदिराची सेवा केली आहे. मंदिराच्या सर्व कार्यक्रमात, नियोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आज त्यांची कार्याध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली .



यावेळी सध्याच्या कार्याध्यक्ष रागिनी खडके, सचिव रावसाहेब वीरप्पा कोनकेरी, रामाप्पा तिमाप्पा मरेगुदरी, तमन्ना मासरेड्डी, शिवाजी लक्ष्मण मोरे,भिकाजी शिनगारे, आप्पासाहेब पुजारी, पुंडलिक होसमनी, बसवराज देसाई, सरपंच विजय गुरव  आदी प्रमुख  विश्वस्त उपस्थित होते.


      -------------------------------