झेप यशाकडे – भाग 2’ या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन

Kolhapur news
By -

 

               

       


           कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        चिन्मय मदर अँड चाईल्ड केअर हॉस्पिटल व मधुश्री पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ राधा मुकुंद संगमनेरकर उर्फ डॉ गीता शहा लिखित ‘झेप यशाकडे – भाग 2’ या प्रेरणादायी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा  वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला.


या पुस्तकाच्या प्रत्येक पानातून संघर्षाची, जिद्दीची आणि यशाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची अनुभूती वाचकांना होईल. डॉ.गीता शहा यांचे लेखन म्हणजे केवळ शब्दांचा संग्रह नसून, ते जीवनाला दिशा देणारे मार्गदर्शन आहे.समाजातील तरुणांनी प्रेरणा घ्यावी आणि स्वप्नांची उंच झेप घ्यावी, हा या पुस्तकाचा खरा संदेश आहे.


यावेळी ससून हॉस्पिटलचे माजी विभागप्रमुख व एमडी स्त्रीरोग्य प्रसुती शास्त्रज्ञ तज्ञ डॉ. रमेश भोसले, डॉ. मुकुंद संगमनेरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


          ---------------------------------