कोल्हापूर न्यूज नेटवर्क
अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त त्यांना मुरगूड येथे उत्साही वातावरणात अभिवादन करण्यात आले.भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ या मध्ये त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान होते.
त्यांचे स्फूर्तीदायक पोवाडे व परखड लेखन यातून खुप मोठी समाज जागृती झाली होती. विशेषतः तळागाळातील उपेक्षित ,निराधार लोकांच्या उन्नती साठी त्यांनी आपले सारे जीवन खर्ची घातले.त्यांचा जन्म मातंग समाजात झाला होता.समाजातील अस्पृशतेवर त्यांनी प्रभावी लेखन केले. प्रभावी दलित साहित्याचे उद्गाते अशी त्यांची ख्याती आहे.त्यांनी ३५ कादंबऱ्या लिहिल्या. फकिरा ही त्यांची अत्यंत गाजलेली कादंबरी.राज्य व देश पातळीवर सुद्धा त्यांचा अनेक वेळा सन्मान झाला आहे. घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ते सच्चे अनुयायी होते.
मुरगूड येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यांना अभिवादन करून जयघोष करण्यात आला.माजी नगराध्यक्ष सौ.गौराबाई सोनुले या प्रमुख अतिथी होत्या.पांडुरंग पाटील यांनी डिजिटल फलकाचे अनावरण केले.माजी नगराध्यक्ष बजरंग सोनुले,विक्रम गोधडे ,सामंत,सचिन गोधडे,राजू सोनुले,प्रदीप वरणे,संदीप चौगुले, पांडुरंग रानमळे,मोहन कांबळे आदी उपस्थित होते.
------------------