डांगे महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सव सप्ताह

Kolhapur news
By -

 

          


        कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


         हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात मंगळवार ता.५ ऑगस्ट ते बुधवार ता.१३ ऑगस्ट या कालावधीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव सप्ताह आयोजित केला असल्याची माहिती प्राचार्य डॉ.निरंजन कुलकर्णी यांनी दिली.

 

     मंगळवार ता.५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.०० वाजता हातकणंगले पाच तिकटी येथे सप्ताहाचे उद्घाटन व अहिल्या रॅली,सकाळी ९.०० वाजता महाविद्यालयात मर्दानी खेळ सादरीकरण बुधवार ता.६ ऑगस्ट रोजी सकाळी ९.००  वाजता कर्तुत्वान महिलांचा सन्मान व मुलाखत गुरुवार ता.७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० वाजता विठ्ठल मंदिर, हातकणंगले येथे आरोग्य शिबिर शुक्रवार ता. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० वाजता बिरदेव मंदिर,हातकणंगले येथे धनगर ओवी स्पर्धा शनिवार ता.९ ऑगस्ट रोजी सकाळी ८.०० वाजता महाविद्यालयात वक्तृत्व,निबंध, हस्ताक्षर,मेहंदी स्पर्धा सोमवार ता.११  ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० वाजता विठ्ठल मंदिर,हातकणंगले येथे महिलाविषयक कायदे मार्गदर्शन व्याख्यान मंगळवार ता.१२  ऑगस्ट रोजी सकाळी ९.०० वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये ग्रंथ प्रदर्शन व डॉक्युमेंटरी चित्रपट बुधवार ता.१३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता महाविद्यालय सेमिनार हॉलमध्ये सप्ताह समारोप व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला आहे.


          --------------------------