कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर खंडपीठाची आज अखेर घोषणा झाली आहे. कोल्हापूरकरांसह पश्चिम महाराष्ट्रातील तमाम पक्षकारांच्या, विधीतज्ञांचा आणि याचिकाकर्त्यांचा गेल्या ४० वर्षांच्या लढ्याची आज अखेर स्वप्नपुर्ती झाली आहे . मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांनी राज्यपालांच्या मान्यतेने तसे शासन राजपत्र प्रसिद्ध केले आहे .
१ ऑगस्ट २०२५ च्या महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ मध्ये हे घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.या घोषणा पत्रास राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचीही मंजुरी प्राप्त झाली आहे.
कोल्हापूर सह पाच जिल्ह्यासाठी हे सर्किट बेंच न्यायदानाचे काम करेल. कोल्हापुर बार असोसिएशन ने यासाठी अनेक वेळा आंदोलने केली होती.साखळी उपोषण , बैठा सत्याग्रह, कोर्टकाम बहिष्कार,प्रसार माध्यमांशी संपर्क ,पालक मंत्री,मुख्य मंत्री, राजकीय पक्ष प्रमुखांच्या गाठी भेटी,निवेदने असे सर्व प्रकारचे प्रयत्न केले होते.त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे तसेच हजारो पक्षकारांच्या पाठिंब्यामुळे सर्किट बेंच कोल्हापूरला आणण्यात यश मिळाले आहे.
न्यायदान क्षेत्रातील हा एक क्रांतिकारक निर्णय मानला जातो.
----------------------