निवडणुका पावसाळ्यानंतर

Kolhapur news
By -

 

                


      मुंबई : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. राज्यातील पूर परिस्थितीमुळे सहकार विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शासनाने परिपत्रक काढून दिली आहे.


राज्यातील अनेक जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती विचारात घेऊन ज्या सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेतील चिन्ह वाटपाचा टप्पा पूर्ण झाला आहे. अशा संस्था, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिली पदाधिकारी निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे अशा संस्था तसेच ज्या प्रकरणी संस्थेची निवडणूक घेण्याबाबत उच्च न्यायालय, मा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत अशा संस्था वगळून महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम, २०१४ मधील नियम ४ मध्ये नमूद केलेल्या 'अ' व 'ब' वर्गातील सहकारी संस्थांची निवडणूक या आदेशाच्या दिनांकापासून सध्या ज्या टप्यावर आहे त्या टप्प्यावर दि. ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे शासनाने परिपत्रकात म्हटले आहे.


             ------------------