कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हेरले / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिर हेरले येथे स्वस्थ नारी – सशक्त परिवारअभियानांतर्गत महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, दि. 19 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत घेण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन हेरलेचे लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे, उपसरपंच निलोफर खतीब व ग्रामपंचायत सदस्या उर्मिला कुरणे यांच्या हस्ते झाले.या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय महाडिक, आरोग्य सहाय्यक प्रशांत घोलपे, श्रेणिक कोथले, आरोग्य सहायिका सलोमी कदम, मंजुला वसावे, आरोग्य सेवक रोहित पाटील, गणेश पाटील, विजय गोल्हार, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका, आंगनवाडी सेविका व ग्रामपंचायतीचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.
या शिबिरात महिलांसाठी बीपी, शुगर, ईसीजी, रक्त तपासण्या, डोळ्यांची तपासणी, कॅन्सर तपासणी, गर्भवती माता (HR ANC) तपासणी, तसेच तीन वर्षाखालील कमी वजनाच्या मुलांची तपासणी अशा विविध सेवा देण्यात आल्या.गावातील 500 च्या वर महिलांनी या शिबिराचा उत्स्फूर्त प्रतिसाद देत आरोग्य सेवांचा लाभ घेतला.
-------------------------