कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. मुरगुडचे ग्रामदैवत असलेल्या अंबाबाई मंदिराची स्वयंसेवकांकडून स्वच्छता करण्यात आली. तरुणांनी रविवार आणि बुधवार रोजी प्रत्येकी ४ तासांचा वेळ स्वच्छतेसाठी देत संपूर्ण मंदिर स्वच्छ केले.त्यासाठी त्यांनी मुरगूड अग्निशामक दलाची मदत घेतली. बंबामार्फत संपूर्ण मंदिर आधी पाण्याने धुऊन काढले. अंबाबाई मंदिरासह ,लक्ष्मी मंदिर, सूर्यापकाका, मरगूबाई मंदिर आणि परिसराची स्वच्छता सुद्धा त्यांनी केली.
युवकांनी हाती झाडू घेऊन परिसराची सुध्दा स्वच्छता केली. दसरा उत्सवासाठी येणारे भाविक व माहेर वासिनी महिलांनी सुद्धा स्वयंसेवकांचे कौतुक केले व आपली मदत देऊ केली.युवकांनी मदत नाकारत दिवसभर स्वच्छता मोहीम पार पाडली.
सहभागी स्वयंसेवक याप्रमाणे.
गणेश नागरीचे पतसंस्थेचे अध्यक्ष सोमनाथ यरनाळकर,सर्जेराव भाट,जगदीश गुरव, ओंकार पोतदार,रघुनाथ बोडके, संकेत शहा, प्रकाश पारिषवाड, तानाजी भराडे, अमोल मेटकर, विनायक मेटकर, प्रणित कुन्नूर,सागर शहा, प्रफुल्ल कांबळे ,अक्षय पोतदार, धोंडीराम परीट,धनंजय सूर्यवंशी, प्रशांत करडे,शिवाजी चौगले, अमर लोहार,आनंदा रामाने, चेतन गवाणकर, अमित दरेकर,नामदेव आनंदा मोरे, सचिन गुरव जगदीश गुरव यांच्यासह अंबाबाई सेवेकरी व भक्त उपस्थित होते.
--------------------------