कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गोकुळच्या चेअरमनपदी निवड झाल्यापासून नविद मुश्रीफ दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील आहेत.वार्षिक सभेतही त्यांनी दूध उत्पादकांच्या हिताच्या योजनेवर भर दिला आहे. तर आजच त्यांची सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे . यामध्ये त्यांनी, 'खरं इन्व्हेस्टमेंट तेच, जे आपल्याला भविष्यात उत्पन्न देतं. दोन लाखांच्या आयफोनपेक्षा-दोन गायी, म्हैशीत पैसे गुंतवा असे म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी आता आयफोनमध्ये दोन लाख रुपये गुंतविल्यानंतर दोन वर्षांनी त्याची किंमत चाळीस हजार असेल. तर गाय आणि म्हैस खरेदीत दोन लाख रुपये गुंतवल्यानंतर दोन वर्षानंतर हे पशुधन सहा लाख रुपये किंमतीचे होईल.' असे आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. आयफोन आणि गाय-म्हैस खरेदीतील तुलनात्मक मांडणी करताना त्यांनी पशुधनाचं महत्व आणि मोल अधिक असल्याचे सांगितले आहे.
----------------