एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट : वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार : दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Kolhapur news
By -

 

             


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


         एसटीच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान आणि पात्र कर्मचाऱ्यांना १२५०० रुपये अग्रिम वेतन देण्याचा निर्णय  शासनाने घेतला आहे.तसेच  वेतनासोबत  वेतनवाढ फरक सुध्दा मिळेल. त्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा  निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहिर केला.


   उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की पूरग्रस्त शेतकऱ्यांचे संकट निवारणास शासन कटिबद्ध आहे.तरीही एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी सुद्धा आनंदात जावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.


एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, एस. टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर,  विविध संघटनांचे  प्रतिनिधी उपस्थित होते.


परिवहन खात्याचे  जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी ही.माहिती कोल्हापूर न्यूज ला दिली.


                 ----------------------------