कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथे सामाजिक वनीकरण विभाग व वेदांतिका पब्लिसिटी यांच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन एक सामाजिक उपक्रम म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
हमिदवाडा परिमंडळ च्या वनपाल प्रतिभा पाटील यांच्या पुढाकाराने मुरगूड परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना हापूस आंबा रोप मान्यवरांच्या हस्ते भेट देवून त्यांच्या गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तिराळे हे होते.
शिवाजीराव मगदूम म्हणाले,वृत्तपत्र व्यवसायातील दुर्लक्षित घटक म्हणूनच वृत्तपत्र विक्रेता राहिला आहे. ऊन,वारा,पाऊस,महापूर अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा वृत्तपत्र विक्रेते आपले काम चोख व प्रामाणिकपणे करतात.प्रतिभा पाटील म्हणाल्या एका अर्थाने समाजसेवेचे व्रत घेतलेल्या या घटकाकडे अक्षम्य दुर्लक्ष होणे ही शोकांतिकाच आहे.
प्रकाश तिराळे म्हणाले , जागतिक घडामोडी घरा घरा पर्यंत पोहचवण्याचे काम वृत्तपत्र विक्रेते करत असतात.त्यांच्यासाठी शासनाने कल्याणकारी महामंडळ स्थापन केले आहे.पण त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
यावेळी कागल तालुका पेपर विक्रेता संघटनेचे अध्यक्ष काँ.शिवाजीराव मगदूम,उपाध्यक्ष मधुकर सुतार (भडगांव), सेक्रेटरी अँन्थोनी बारदेस्कर,(मुरगूड) ,बाजीराव इंगळे (चिमगांव ) यांच्यासह परिसरातील विक्रेते व वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
-------------------------

