मुलींनो खूप शिका मोठी स्वप्ने पाहण्याची जिद्द ठेवा - डॉ.मंजिरी मोरे

Kolhapur news
By -

 

               



                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क   

  बदलत्या शैक्षणिक धोरणामध्ये मुलीने शिकले पाहिजे, स्वतःची आयडेंटिटी निर्माण केली पाहिजे, घरसंसार सांभाळायचा तर त्यापूर्वी स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक स्वावलंबी बनले पाहिजे.त्यासाठी जिद्द हवी . स्वप्ने हवीत, कष्ट हवेत असे मौलिक मार्गदर्शन शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संस्थेच्या चेअरमन डॉ .मंजिरी मोरे यांनी हादगा महोत्सवात मुलींना केले.


 मुरगुड विद्यालय ज्युनिअर कॉलेज येथे महाहादगा सांगता समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या  बोलत होत्या .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस पी पाटील होते. सुहासिनीदेवी  पाटील, ऋतुजा मोरे ,प्रमुख उपस्थित होत्या .



     सण,उत्सव,कल्चर विवाह ,संसार या गोष्टी आयुष्यात येणारच आहेत. पण त्याहून अधिक आधुनिक शिक्षण घेऊन स्वावलंबी जीवन जगणे हे मुलींसाठी आवश्यक आहे. आजोबा एम.आर.देसाई , बॅरिस्टर खर्डेकर ,यांच्या शिक्षण संस्थेत शिकलेल्या मुली तेजस्वी व स्वाभिमानी आयुष्य  जगतील तर  त्यांच्या कीर्तीला  सोनेरी किनार लागेल.प्राचीन कृषक परंपरा आणि आधुनिकता, विज्ञानवाद यांची अनोखी वीण जपणारा मुरगुड विद्यालयाचा हादगा महोत्सव उत्साहाने संपन्न झाला.


      ग्रामीण मुली हस्तनक्षत्रात कृषक संस्कृती, आधुनिक विज्ञान ,विवेकवाद आणि प्राचीन परंपरा यांचा मेळ घालून जगण्याची रीत प्रस्थापित करतात. हा सहशालेय उपक्रम सलग 35 वर्षे राबवला जात आहे. यावेळी विद्यालयाच्या 600 मुलीनी पारंपारिक पद्धतीने विद्यार्थीनींनी रिंगण धरत गीत गायन केले. ऋतुजा देसाई यांनी आपल्या मनोगतात विद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.


  उपमुख्याध्यापक एस बी सूर्यवंशी उपप्राचार्य व्ही.जी घोरपडे, पर्यवेक्षक एस डी साठे पी.बी लोकरे एम.एच. खराडे, एस एस कोंडेकर वाय .ई देशमुख, ए एम कोळी, व्ही एस सूर्यवंशी एस आर भोई एस पी बाईत जी व्ही पाटील यू पी कांबळे एस एस पाटील जे.टी.पवार, अश्विनी गोरुले अश्विनी नलवडे, एम आर राऊत,


 स्वागत व प्रास्ताविक प्रा. टी एस पाटील, सूत्रसंचालन बी.वाय. मुसाई सौ.के.एस.पाटील यांनी केले. आभार सौ एल के पाटील यांनी मानले.




         ------------------------------------