कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असे म्हणत विकासाचा वसा घेतलेल्या नेतृत्वाने जर घराणेशाहीची पताका फडकवायला सुरुवात केली तर ती एक अनिष्ठ प्रथा पडेल.
अर्थात ही प्रथा कांहीं आजचीच नाही.गेली.८० वर्षे देशाच्या नशिबात हेच आले आहे. हजार वर्षे गुलामगिरीत घालवून स्वतंत्र झालेल्या या सुजलाम सुफलाम देशाच्या सत्तेला नेहरू गांधी घराणे ७० वर्षे चिकटून बसले होते.आजही त्या घराण्याची तीच धडपड सुरू आहे.
आधी भोळ्या भाबड्या जनतेच्या मनात स्थान मिळवायचे आणि नंतर त्याचाच लाभ घेत घराणेशाहीचा झेंडा फडकवायचा.
राष्ट्र,राज्य,आणि जिह्यातून सुद्धा हेच चित्र दिसत आहे.सामान्य जनतेत अनेक विचारवंत,कर्तृत्ववान सेवाभावी युवक असतात.त्यांच्याजवळ पैसा सोडून सर्व काही असते. अशा युवकांना जनतेने डोक्या खांद्यावर घेऊन सी एम च्या खुर्चीवर बसवल्याचे आपण फक्त सिनेमात बघतो.बॉलिवूडचा अनील कपुर , टॉलिवूडचा महेश बाबू असे अनेक सामान्य हिरो सी एम पर्यंत पोहोचलेले सिनेमाच्या स्टोरीतच पहायला मिळाले असले तरी वास्तवातील चित्र अगदी वेगळे आहे.फार लांब जायचे कारण नाही.कोल्हापूर , सोलापूर, पुणे,मुंबई,नाशिक मध्ये काय चित्र आहे.
कोल्हापूरचे जुने नवे खासदार,सोलापूरच्या प्रणिती ताई,बारामतीच्या सुप्रिया ताई, नाशिकचे भुजबळ उर्फ बाहुबली, उर्फ आर्मस्ट्राँग,मुंबईचे उद्धव,राज ही मंडळी वडिलोपार्जित वसा घेऊन नेतृत्वात आली.त्यापैकी काहींची वक्तव्ये पाहिली तर पारावरच्या पटकेवाल्या दादा मामांच्या गप्पा बऱ्या म्हणण्याची वेळ येते.अनेक टीव्ही सीरियल मध्ये अशी भाषणबाजी ऐकायला मिळते.
कोल्हापूरचे गोकुळ आता त्याच वाटेवर चालले आहे.ज्यांनी हाडाची काडे करून हा विशाल संघ उभा केला ते आनंदराव पाटील चुयेकर बाजूला फेकले गेलेत.महाडिकांनी आपली सत्ता स्थापन करून तीस वर्षे त्याचे खाजगीकरणच केले होते.गोकुळ मध्ये गोपाळ टँकर केंव्हा घुसले हे उत्पादकांना कळलेच नाही.
उत्पादक फक्त शेतात आणि मळ्यात गाई म्हशींच्या धारा काढत बसलेले असतात.त्यात आया भगिनींचे कष्ट अधिक असतात. ठरावधारक बहुदा विकले गेलेले असतात. म्हणजे पैसा आलाच.जिल्हा परिषद,जिल्हा बँक,महानगरपालिका यामध्ये सुद्धा हेच चित्र आहे. पैसा हाच परमेश्वर.
कोल्हापूर शहरातील खड्ड्यांनी भरलेले रस्ते आणि त्यामुळे होणारे अपघात ज्यांनी पाहिलेत ते अक्षरश: ठेवणीतल्या कोल्हापुरी शिव्यांची लाखोली वाहतात.प्रशासक नोकरी सांभाळत बसलेले असतात.आपला पोरगा,पोरगी, सून कशी खुर्चीवर बसेल एवढाच विचार वरच्या नेतृत्वाने करायचा.तेच वाघ सिंह वाघीण .बाकीचे कुई ..करत फडात फिरणारे कोल्हेच.
घराणेशाहीची ही अनिष्ट प्रथा लोकशाहीला घातक आहे.
महात्मा गांधी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर , सुभाषचंद्र बोस, वल्लभ भाई पटेल. लाल बहादूर शास्त्री,डॉ. अब्दुल कलाम,अटल बिहारी वाजपेयी यांना लाख सलाम करावेसे वाटतात ते यासाठीच.त्यांनी आपले वारस कधीच ठरवले नव्हते.
जय हिंद
--------------------------

