कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड येथे भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून पुस्तक प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते.
पुस्तक प्रदर्शन उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरच्या चेअरमन डॉ. मंजिरी मोरे यांच्या हस्ते ऋतुजा मोरे सुहासिनी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य एस पी पाटील होते.
स्वागत पर्यवेक्षक एस.डी. साठे यांनी तर प्रास्ताविक उपमुख्याध्यापक एस बी सूर्यवंशी यांनी केले. यावेळी डॉ. मंजिरी मोरे म्हणाल्या वाचन संस्कृतीला बळ देणे काळाची गरज आहे. वाचाल तर वाचाल यासाठी विद्यार्थ्यांच्या मध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रसंगी ऋतुजा मोरे यांचे भाषण झाले.
कार्यक्रमास उपप्राचार्य व्ही जी घोरपडे, एस एस कळंत्रे, पी.बी लोकरे, एस जे कटके, एम बी टिपुगडे, आर जी पाटील, एस डी कुंभार, ए एन पाटील, एस एम लोकरे, एम एच खराडे, डी जे परीट, आर एस बुरुड, एम डी खाटांगळे, ए.एस मांगोरे, टी आर शेळके ,पी एस पाटील आदी मान्यवर हजर होते.
सूत्रसंचालन एस एस कोंडेकर यांनी तर आभार ग्रंथपाल पी आर डेळेकर यांनी मानले.
---------------------------------


