कोल्हापूर न्यूज / वि.रा. भोसले
उद्यापासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत (ODI) विराट,रोहित आणि शुभमन गिल कांगारूंचे कंबरडे मोडणार आणि देशवासीयांना दिवाळी भेट देणार हे नक्की.
आय सी सी मध्ये पाकिस्तानला पाणी पाजून "क्रिकेटचे ऑपरेशन सिन्दुर " आपल्या क्रिकेट वीरांनी जिंकले आहे.पाकिस्तान च्या खेळाडूंनी सिंदूरची खिल्ली उडविण्याचा मस्तवालपणा केला होता.सत्तेवरील त्यांच्या आकां नी घमेंडीची भाषा वापरून जगभर नालस्ती करून घेतली होती.तीच त्यांच्या क्रिकेट टीम ने देखील करून घेतली.आपल्या खेळाडूंनी त्यांच्याशी हस्तांदोलन सुद्धा केले नाही.एवढेच काय जिंकलेला चषक सुद्धा त्यांच्या अध्यक्षाकडून स्वीकारला नाही.सूर्यकुमारने आपली बिदागी भारतीय सेनेला अर्पण केली.याला म्हणतात राष्ट्र प्रेम. सूर्यकुमार जिंदाबाद.ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सुद्धा असेच मस्ती खोर आहेत.त्यांनी परवा पाकिस्तानी खेळाडूंचाच कित्ता गिरवला.तशाच नकला केल्या. नाकाला हात लावून ,बोटे नाचवून जी ओंगळ वाणी कृती केली ती त्यांच्या क्रिकेट मधील आजवरच्या यशस्वी कामगिरीला न शोभणारी आहे.मागे विश्वचषक जिंकला तेव्हा बक्षीस वितरण समारंभात शरद पवार यांचा ही त्यांनी अवमान केला होता.त्यांची राजकीय प्रतिमा सुध्दा लक्षात न घेता धक्का देण्याचा धसमुसळेपणा कांगारूंनी केला होता.अशा या मस्तवाल.कांगारूंचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.
एक गोष्ट येथे मुद्दाम नमूद करावीशी वाटते.ऑस्ट्रेलियन क्रिकेट पूर्ण व्यावसायिक स्वरूपाचे आहे.ब्रिटिशांनी जगावर राज्य करण्याची महत्वाकांक्षा बाळगली होती.ईस्ट इंडिया या व्यापारी कंपनीने भारत कधीच काबीज केला होता.अफू साठी या व्यापाऱ्यांनी चीन वर डोळा ठेवला होता.चीनने आत घुसू दिले नाही.जपान तर विजुगेषी राष्ट्र होते.या दोन राष्ट्रांसमोर टिकाव न लागल्याने हे व्यापारी हजारो किमी दूर असलेल्या ऑस्ट्रेलियाकडे वळले.तेथील मूळ गरीब आदिवासींवर बंदुकीच्या जोरावर राज्य करू लागले. राष्ट्राभिमान वाटावा असे त्यांचे ते मूळ राष्ट्र नाही.थोडक्यात
"ठग ज ऑफ वासेपूर"असेच त्यांचे वर्णन करावे लागेल.इतर जगा पासून अलिप्त असलेल्या या खंडावर कांगारू हा प्राणी वावरतो.इतर खंडात तो उत्क्रांत होऊ शकला नाही.ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटर्स ना कांगारू म्हणतात. ही बिरुदावली त्यांना न शोभणारी आहे कारण कांगारू हा प्राणी गरीब व निरुपद्रवी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये याच नावाने ते ओळखले जातात त्यामुळे नाईलाजाने ठगांना कांगारू म्हणणे भाग आहे. १९,२३ व २५ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियात त्यांच्या बरोबर भारताचे एकदिवसीय (ODI) सामने होणार आहेत.भारतात त्यावेळी दीपावलीचा आनंदोत्सव सुरू असणार आहे.
विराट,रोहित आणि शुभमन हे या मस्तवाल कांगारूंचे कंबरडे मोडून देशवासीयांना दिपावलीची गोड भेट देतील याची खात्री बाळगुया.
-------------------

