कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांना दिवाळीभेट म्हणून सणासुदीच्या साहित्याचे वाटप केले.
अवघ्या एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या या पतसंस्थेने १० कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या.संस्थेने १३ महिन्याच्या ठेवीवर १०% व्याज देण्याचे जाहीर केले होते.सभासदांनी सुद्धा भरघोस प्रतिसाद दिला.
सभासदांनी संस्थेवर दाखवलेल्या या विश्वासास ऋणी राहून सभासदांना पहिल्याच वर्षी आनंद भेट दिल्याचे चेअरमन जावेद मकानदार यांनी सांगितले. वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी हाजी धोंडीबा मकानदार होते.
व्यासपीठावर प्रमुख उपस्थितांमध्ये उपाध्यक्ष मधुकर कुंभार, सुहास खराडे, पांडुरंग कुडवे,निवास कदम,आदींचा समावेश होता.सचिव अजित कुमार कापसे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.सचिन मिसाळ यांनी आभार मानले.
प्रातिनिधिक स्वरूपात पाच सभासदांचा व्यासपीठावर सत्कारही करण्यात आला.
-------

