शेतकऱ्यांच्यासाठी यंदा काळी दिवाळी साजरी करणार

Kolhapur news
By -

           


पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने मदत करत नाही. त्यामुळे आमच्या पक्षाने शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी यंदा काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सरकारवर निशाणा साधताना केली. दिवाळीनंतर आपण या प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.


शरद पवार यांनी शुक्रवारी सकाळी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी सरकारची शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करण्याची तयार नसल्यामुळे काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आल्याचा आरोप केला. ते म्हणाले, मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यानंतरही हे सरकार शेतकऱ्यांना मोकळ्या हाताने मदत करण्यात कुचराई करत आहे. त्यामुळे आमच्या पक्षाने राज्यभरात काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मला या प्रकरणी राजकारण करायचे नाही. पण या सरकारची शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असल्याचे मला वाटते. 


            -----------------