एकाच आवारातील मुला मुलींच्या शाळा होणार एकत्र

Kolhapur news
By -

 

          


 मुंबई : एकाच आवारात मुले व मुलींच्या स्वतंत्र शाळा असल्यास त्यांचे तत्काळ एकत्रिकरण करुन स्वतंत्र शाळांचे रुपांतरण सहशिक्षणाच्या शाळेत करण्यात यावे असा आदेश शासनाने काढला आहे .यानुषंगाने अंमलबजावणीचे अधिकार आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य यांना प्रदान करण्यात आले आहेत. संबंधित शाळेला एकच युडायस क्रमांक लागू  राहणार आहे. 

 

    याव्यतिरिक्त ज्या स्वतंत्र शाळा कार्यरत आहेत, अशा शाळांनी संयुक्त शाळेस मान्यता देण्याचे प्रस्ताव सादर केल्यास अशा प्रस्तावांना मान्यता देण्याचे अधिकार आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य यांना प्रदान करण्यात आले आहेत.


                ---------------------------