शिवसेना ( शिंदे गट ) उपतालूका प्रमुखपदी सुरेश कांबरे यांची निवड

Kolhapur news
By -

 

             


                कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


     हेरले (प्रतिनिधी ) मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रा.पं सदस्य सुरेश कांबरे यांची शिवसेना (शिंदेगट ) हातकणंगले उपतालुका प्रमुखपदी निवड करण्यात आली . त्यांना निवडीचे पत्र खासदार धैर्यशील माने व माजी खास . संजयदादा मंडलिक यांच्या हस्ते देण्यात आले . 


याप्रसंगी त्यांना जिल्हाप्रमुख रविंद्र माने , उपजिल्हाप्रमुख अविनाश बनगे , माजी आम . सुजित मिणचेकर, तालूका प्रमुख अजित सुतार ,  सुनिल खारेपाटणे ,  रघूनाथ गोरड , सतिश वाकरेकर , अविनाश पाटील , सतिशकुमार चौगुले, स्वप्नील चौगुले, अमोल झांबरे, नेताजी माने, रामदास कांबरे , यांचे मोलाचे सहकार्य लाभले . निवडीचे पत्र मिळताच कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.


               -------------------------