मुंबई : एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअसे ते म्हणाले.
कामगार संघटने सोबत मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता , घरभाडेभत्ता व अन्य थकित भत्ते,दिवाळी सणाचे अग्रिम,या बाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल.२०१८ पासून उपरोक्त देणी प्रलंबित असून त्यासाठी४४०० कोटी रुपये लागतील .
ना.सरनाईक यांनी एस टी ला आर्थिक दृष्ट्या कसे समृद्ध करता येईल यावर सुद्धा कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.जाहिराती,पार्सल सेवा,पेट्रोल पंप यातून वार्षिक ५००ते६०० कोटी मिळवता येतील .स्वतःचे एस टी अँप ,महामंडळाची स्थावर मालमत्ता विकसित करणे यातून दीड हजार कोटींचे वार्षिक उत्पन्न अपेक्षित आहे.महामंडळ पुढील वर्षी ८ हजार बसेस विकत घेणार आहे,एकूण.१८ ते२० हजार बस संख्या करण्यात येईल.
या बैठकीस एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ . माधव कुसेकर,सहसचिव राजेंद्र होळकर, विविध संघटनांचे संदीप शिंदे,समीर मोरे,श्रीरंग बरगे,हनुमंत ताटे,प्रकाश निंबाळकर,मुकेश तीगोटे,प्रदीप धुरंदर व एस टी कामगार संघटनाचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
परिवहन चे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी ही माहिती कोल्हापूर न्यूज ला दिली.
------------------------------



