स्व.सदाशिवराव मंडलिक यांची ९१ वी जयंती उत्साहात साजरी.

Kolhapur news
By -

 


             


             कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


               लोकनेते स्व.सदाशिवराव मंडलिक यांची ९१वी जयंती मुरगूड  मध्ये अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी जेष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.माजी प्राचार्य पी व्हि पाटील यांनी त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले स्व.मंडलिक यांनी गोरगरिबांच्या उद्धारासाठी साठी आपले जीवन समर्पित केले.जय शिवराय शिक्षण संस्थे ची स्थापना करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली.गावागावात माध्यमिक शाळा काढल्या.


    पत्रकार प्रा.चौगुले यांनीही आपल्या  विवेचनात स्व.मंडलिक यांच्या कार्याचा आढावा घेतला.गल्ली ते दिल्ली पर्यंत त्यांनी विधायक कार्याचा ठसा उमटवला होता.तळागाळातला माणूस हा त्यांच्या सेवेचा केंद्रबिंदू होता.हमालापासून ते हवेलीतल्या उद्योगपती पर्यंत लाखो लोकांना सदाशिवराव मंडलिक आपले दैवत वाटत होते.


 त्यांच्या चिकाटीच्या पाठपुराव्याने  काळम्मावाडी प्रकल्प पूर्णत्वास गेला.दूधगंगा आणि वेदगंगा बारमाही दुथडी भरून वाहू लागल्या. त्यामुळे दुष्काळी शेतकरी बांधवांचे अश्रू पुसण्याचे पुण्य त्यांना लाभले.यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते शिवराज विद्यालयातील सर्व मुलामुलींना बुंदी लाडूचा खाऊ वाटण्यात आला. जनतेचे आशीर्वाद  साहेबांनी नेहमीच शिरसावंद्य मानले होते.त्यामुळे ज्येष्ठांना सन्मानित करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद वाटला.

    "अमर रहे अमर रहे मंडलिक साहेब अमर रहे" च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.


     यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके पी डी मगदूम, व्ही आर भोसले, एस व्ही चौगले, जयसिंग भोसले, बबन बारदेस्कर, किरण गवानकर, सुहास खराडे, सुनील रणनवरे, बाजीराव खराडे, राजेंद्र भाट, रवींद्र शिंदे, प्रवीण सूर्यवंशी, दत्तात्रय, मंडलिक विक्रम गोधडे, दीपक शिंदे, सर्व नगरसेवक व नगरसेविका आणि शिक्षक उपस्थित होते.






                  -----------------------