कोल्हापूर न्यूज नेटवर्क
प्रा.हिंदूराव दत्तात्रय तिराळे यांना सन २०२५ सालचा कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
प्रा.तिराळे हे दूध साखर विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज बिद्री येथे २८ वर्षे भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापक म्हणून काम पाहत असून सध्या ते उपप्राचार्य पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्यां सोडवण्यासाठी जी आंदोलने झाली,मोर्चे निघाले, त्यामध्ये त्यांचा सहभाग होता.१२ वी परीक्षेत केंद्रसंचालक म्हणून ही त्यांनी काम पाहिले आहे.शिवाय जिल्हा व तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आहे. बिद्री चे चेअरमन के.पी.पाटील, व्हा.चेअरमन मनोज फराकटे,सेक्रेटरी एस.डी.किल्लेदार,प्राचार्य एस.के.खांबे, निवृत्त प्रा.चंद्रकांत जाधव आदींचे मार्गदर्शन लाभले.
-------------------------

