कोल्हापूर न्यूज नेटवर्क
' रोजा जानेमन, साथीया तुने क्या किया, दिवानी दिवाना, सुन दिलरुबा, आजा शाम होने आई, मुझ से जुदा होकर. ' अशा स्वर्गीय गायक एस.पी. बालसुबमण्यम यांनी अजरामर केलेल्या गीतातून कोल्हापुरातील एसपीबी फॅन्स क्लब, कोल्हापूर यांच्यावतीने एस.पी.बालसुब्रमण्यम यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्याच्या.शिक्षणाधिकारी (प्राथ.) डॉ.मीना शेंडकर, माध्यमिक पे युनिट अधीक्षक उदय सरनाईक, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) आर.व्ही.कांबळे, पुष्पा आरडे संजय चितारे, रमेश निबांळकर, रणजित मंडलिक, मधुसुदन शिखरे शुभ हस्ते एस.पी.बालसुब्रमण्यम यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने व रोपास पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. मीना शंकर यांनी आपल्या मनोगत आतून एस.पी.बालसुब्रमण्यम यांच्या आठवणींना उजळा देत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
" ये हँसी वादिया,हवा में क्या है, आके तेरी बाहो में, हम तुम दोनो जब मिल जायेंगे, जीना तेरी गली में, ओ मारिया, रूप सुहाना लगता है, ओ मेरी दिलरुबा, ज्योतीयेले, तुमसे जो देखते ही प्यार हुआ,प्रियतमा ओ प्रियतमा, सपनो में आना अशी एस.पी.बालसुब्रमण्यम यांनी अजरामर केलेली एका पेक्षा एक सरस गाण्यांचे सादरीकरण करून एसपीबी फॅन्स क्लब च्या सर्व सदस्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
कार्यक्रम प्रसंगी पुणे मतदार संघाचे शिक्षक आम.प्रा. जयंत आसगावकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.प्रेक्षकांच्या हाउसफुल्ल गर्दीने कार्यक्रमाची रंगत वाढली. टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत प्रेक्षकांनी प्रत्येक गाण्याला प्रतिसाद दिला. तर महेंद्र कुलकर्णी यांच्या अभ्यासपूर्ण व विनोदी शैलीतील सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची उंची वाढवली.
कार्यक्रमात शेखर भोसले, जावेद नायकवडी, सागर मौर्य,निलेश निंबाळकर,शैलेश कुरणे,राजेंद्र कोरे यांच्यासह स्वप्ना जोग,सोनाली रायकर, ज्योती शिंदे व सपना पाटील यांनी गीत गायनातून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
एसपीबी फॅन क्लबचे प्रमुख शेखर भोसले यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर राजेंद्र कोरे यांनी उपस्थित आभार मानले.
-----------------------------------

