मुंबई : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याच्या लाभाचे वितरण उद्यापासून (शुक्रवार) सुरू करण्यात येणार असून, येत्या दोन ते तीन दिवसांत पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम जमा होईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली. तसेच, त्यांनी सर्व लाभार्थी महिलांना पुढील दोन महिन्यांच्या कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहनही केले आहे.
मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.
----------------

