जुन्या पेन्शनकरिता १५ डिसेंबर पासुन हिवाळी अधिवेशनात बेमुदत धरणे आंदोलन करणार - प्रा. विजय शिरोळकर

Kolhapur news
By -

 

            


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


    कोपरखैरणे येथील ज्ञानविकास विद्यालय मुंबई येथे  महाराष्ट्र राज्य 2005 पूर्वी जुनी पेन्शनग्रस्त राज्यव्यापी सहविचार सभा संपन्न झाली.  ज्ञानविकास संस्थेचे अध्यक्ष ॲड पि. सी.  पाटील यांनी संघटनेला निरंतर सर्वतोपरी मदत करण्याचे जाहीर केले.


यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य याचिका कर्ते प्रदीप महल्ले सरांनी सविस्तर असे सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या विचारातून येणाऱ्या नोव्हेंबर अथवा डिसेंबर अखेर पर्यंत नक्कीच आपणाला जुन्या पेन्शनचा लाभ मिळेल याकरिता आपण  विचलित न राहता सर्वांनी सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवावा असा विश्वास दिला, नाही मिळाल्यास आपणाला एकीच बळ दाखवून शासनास जुनी पेन्शन मंजूर करण्यास भाग पाडणे गरजेचे आहे असेही आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.


 त्याचबरोबर कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांनी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत व तुम्हाला पेन्शन मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा संदेश आजच्या उपस्थित सह विचार मिळाव्यात केला. टप्पा अनुदानितचा प्रश्न निकाली काढला असून पुढे येणाऱ्या काळात 2005 पूर्वीच्या पेन्शनग्रस्त बांधवांसाठी मी काम करेन अन्यथा मी पण विधिमंडळाचे  पेन्शन स्वीकारणार नाही असे सांगितले. त्याचबरोबर  नवनियुक्त महासचिव भास्कर देशमुख सरांनी हा लढा तीव्र करणार असल्याचा इशारा दिला. याकरिता हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे हजारोच्या संख्येने जुन्या पेन्शनग्रस्त बांधवांनी एकत्र येऊन आपला लढा कायम चालू ठेवण्याचा संदेश दिला. राज्याध्यक्ष प्रा.विजय शिरोळकर सरांनी ही संघटना नक्कीच येणाऱ्या काळात एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मंजूर केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास दिला व पुढे शासनाने वेळोवेळी केलेल्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर 15 डिसेंबर पासून यशवंत स्टेडियम नागपूर येथे बेमुदत धरणे आंदोलन  करणार असल्याचे जाहीर केले. जुन्या पेन्शन चे सेवानिवृत्त  लढवय्ये काका कोल्हे यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र यावे अशी विनंती केली.  कार्यक्रमानंतर कोअर कमिटीची बैठक पार पडली. आज पर्यंत संघटनेसाठी दिलेल्या योगदानाचा विचार करून  मुंबईस्थित संघटनेच्या प्रशासकीय मंत्रालयीन व इतर कामाच्या सोयीसाठी नव्याने संघटनेमध्ये महासचिव  पद निर्माण करून मा. भास्कर देशमुख सरांनी पद स्वीकारावे अशी विनंती सर्वानुमते करण्यात आली. आजच्या या राज्यव्यापी सहविचार सभेला अध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर, उपाध्यक्ष प्रा. संपत कदम, कार्याध्यक्ष प्रा. योगेश्वर निकम, महासचिव भास्कर देशमुख, राज्य समन्वयक प्रा. डॉ. गोविंद गोडसे, नाना राजगे सर, काकासाहेब कोल्हे, राजू लहासे, प्रा. सोनटक्के सर प्रा. मुंगाळे , प्रा . दासव सर, प्रा. कुडतरकर  , संजय पालवे , खेडेकर सर, साबळे  तसेच  महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते. महिलांचे संख्या तरी लक्षणीय होती . सर्वांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


                      ------------------------