कोल्हापुर चा महापौर भाजपचा आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा हे भविष्य मी सहा महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना सांगितले होते - ना. हसन मुश्रीफ

Kolhapur news
By -

 

           


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


        कोल्हापूर शहराचा महापौर हा भाजपचा असेल व जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा असेल असे मी सहा महिन्यापूर्वीच विमानतळावर माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितले होते असे वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री ना हसन मुश्रीफ यांनी मुरगूड येथील जिल्हा परिषद  व पंचायत समिती सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना काढले.


    महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दुःखद अपघाती निधनाबद्दल त्यांना उभे राहून सर्वांनी श्रद्धांजली वाहिली आणि मुख्य सोहळ्यास सुरुवात झाली.


    ना. मुश्रीफ म्हणाले कागल मधील तिन्ही गट आम्ही एकत्र आलो ते कशासाठी हे आधी सांगतो. आमच्या कारखान्यावर कर्जे आहेत. कारखाना 90 दिवस चालतो आणि आम्हाला बारा महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना द्यावा लागतो. त्यात सरकारने आता सोलर वर वीज निर्मिती सुरू केली आहे वाहने इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणार आहेत. वेगाने बदलणाऱ्या या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्हाला ऊस उत्पादन वाढवलेच पाहिजे. ए आय मदतीने शंभर एकरात ऊसउत्पादन वाढीचा प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे.एकरी किमान 100 टन ऊस उत्पादन निघालेच पाहिजे याची शेतकऱ्यांनी ही दखल घ्यावी. 


  अजित दादा म्हणजे पोटातले ओठावर बोलणारे नेते होते. राज्यातल्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची त्यांना ओळख होती. डोंगराएवढे दुःख बाजूला सारून सुमित्रा वहिनींनी त्यांच्या सर्व कामांची जबाबदारी पेलली आहे.


    कार्यक्रमाचे आयोजक गोकुळ चे माजी अध्यक्ष रणजित सिंह पाटील म्हणाले दादा मिश्किल पणे बोलायचे व लडीवाळ पणे दमदाटी सुद्धा द्यायचे. अचानक त्यांच्या अपघाताची बातमी कानी. आली तेव्हा तीर्थ यात्रा मध्येच सोडून आम्हीं बारामतीला गेलो. अपघाताचे विदारक दृश्य पाहून अंगावर काटा उभा राहिला.


    गोकुळ चे संचालक अमरीश घाटगे म्हणाले कागलची स्मार्ट सिटी लवकर पहायला मिळेल.


     शाहू ग्रुप चे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी सुद्धा ए आय तंत्रज्ञानाचा उल्लेख केला.राष्ट्रवादी पक्षातून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य शोभा फराकटे, सुयशा घाटगे, सुवर्ण कांबळे,शिल्पा खोत, शिवानी भोसले, काकासो सावडकर आणि पंचायत समिती सदस्य तेयस्विनी भुरे अनिल हेगडे, सुवर्णा पाटील, दत्तात्रय दंडवते, इंद्रजीत पाटील,रंजना अस्वले, रूपाली आंगज,सुवर्णा जाधव, मनीषा पाटील,सुनिता माळी दीपक सोनार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.


    प्रमुख उपस्थितांमध्ये  केडीशीचे संचालक भैय्या माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब  पाटील असुर्लेकर, मनोज फराकटे, शशिकांत खोत, विकास पाटील, दत्ता मामा खराडे, मुरगूड शहर अध्यक्ष रणजित सुर्यवंशी , अमर चौगुले,जीवन शिंदे, प्रा सुनील मगदूम, रणजीत मुडूकशिवाले इत्यादींचा समावेश होता. आभार भरत लाड यांनी मांनले. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले.


           --------------------------------