नानीबाई चिखली जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले यांच्या हस्ते चिखली येथे पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Kolhapur news
By -

 


                   


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क



 नानीबाई चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत लहान बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात आला. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.



यावेळी शिवानी भोसले यांनी लहान बालकांना पोलिओचे डोस पाजून मोहिमेला सुरुवात केली. त्यांनी पालकांना आपल्या पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओचे डोस देण्याचे आवाहन केले. पोलिओमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याचे लसीकरण वेळेत करून घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.



या प्रसंगी सरपंच तथा प्रशासक युवराज कुंभार , आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. आरोग्य विभागामार्फत लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली असून, गावातील सर्व पात्र बालकांना पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

   



        चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले यांच्या हस्ते लहान बालकाला पोलिओ प्रतिबंधक डोस देऊन लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच युवराज कुंभार व आरोग्य विभागाचे कर्मचारी


            ---------------------------