कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील प्रसिद्ध भीमगीत गायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिमकन्या कडूबाई खरात यांचा तथागत गौतम बुध्द सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्य शिव शाहू फुले व आंबेडकर यांच्यावरील गायनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम नानीबाई चिखली येथील 'थळोबा माळ' पंचशील नगर मध्ये शनिवार दि. १६ मे २०२६ रोजी सांयकाळी सात वाजता आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ ,माजी आमदार संजयबाबा घाटगे , शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे , आरपीआय चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे हे आहेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शिल्पा खोत , कोल्हापूर जिल्हा परिषद महिला बालकल्याण समिती सदस्या शिवानी विजयसिंह भोसले, गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ व युवराज पाटील ,जिल्हा बँक संचालक भैय्या माने, पंचायत समिती सदस्य सुवर्णा जाधव यांच्यासह इतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीणदादा भोसले, कागल तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अरुणराव भोसले, कागल तालुका संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सदाशिव तुकान, प्रशासक युवराज कुंभार यांच्यासह राजेंद्र नुल्ले, यशवंत पाटील , सुरेश पाटील , अल्लाबक्ष सय्यद , पोलीस पाटील अमृता कांबळे , चिखली गावातील सर्व संस्थांचे सभापती, उपसभापती, संचालक व सर्व तरुण मंडळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन संयुक्त जयंती कमिटी, व पंचशील तरूण मंडळ, पंचशील नगर, बौद्ध नगर, आण्णा भाऊ साठे नगर यांनी केले आहे.
कडूबाई खरात यांच्याशी "झी २४ तास" चॅनेलने साधलेल्या संवादाची यूट्यूब लिंक ....
https://youtu.be/g_sarguGnko?si=KLnuY5we-TVSiST8
*********************


