कोल्हापुरात प्रथमच महिलांसाठी 'वुलू पावडर रूम'

Kolhapur news
By -

 




                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या विशेष निधीतून  कोल्हापुरात प्रथमच महिलांसाठी 'वुलू पावडर रूम' हा अत्याधुनिक प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाचा पितळी गणपती, आरटीओ ऑफिस येथील लोकार्पण सोहळा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते संपन्न झाला .


याप्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष  कृष्णराज महाडिक, कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रूपाराणी निकम, उपमहापौर मा. अक्षय जरग  यांच्यासह कोल्हापूर महापालिकेच्या नगरसेविका, नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.


हा उपक्रम महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरामदायी प्रसाधनगृह सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. कोल्हापुरात दोन ठिकाणी “वुलू” असणार आहे. 


“वुलू” (Woloo) ही संकल्पना महिलांसाठी खास तयार करण्यात आलेल्या हायटेक पावडर रूमची आहे. येथे फक्त प्रसाधनगृहच नव्हे तर महिलांसाठी आवश्यक अशा अनेक सुविधा उपलब्ध असणार आहेत.  

स्वच्छ व सुरक्षित टॉयलेट

सॅनिटरी पॅड्स

पिण्याचे पाणी

सॅनिटायझर

प्रतीक्षेसाठी आरामदायी जागा



 ब्युटी व वैयक्तिक उपयोगाच्या वस्तू हा उपक्रम महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः प्रवास करणाऱ्या, कामानिमित्त बाहेर असणाऱ्या किंवा बाजारपेठेत येणाऱ्या महिलांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. 


शहरात स्वच्छ व सुरक्षित महिला स्वच्छतागृहांची गरज लक्षात घेऊन महापालिका, सीएसआर फंड आणि 'वुलू' संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. यामुळे महिलांची गैरसोय दूर होईल, असा विश्वास महापौर रूपाराणी निकम यांनी यावेळी व्यक्त केला.


          *********************