कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील सत्यजित समीर कटके या विद्यार्थ्याने 96.40 टक्के गुण मिळवून मुरगूड केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. याच शाळेच्या आर्यन अमित भोई याने 96 टक्के गुण मिळवून मुरगूड केंद्रात द्वितीय तर कार्तिक विलास अनुसे यांनी 95.80 टक्के गुण घेऊन केंद्रात तृतीय क्रमांक पटकावला. मुरगुड विद्यालयाचा दहावीचा एकूण निकाल 96. 72 टक्के इतका विक्रमी लागला आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी 244 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी 236 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तनिष्का पेडणेकर, तेजस चव्हाण या विद्यार्थ्यांनी टेक्निकल विषयात शंभर पैकी शंभर मार्क मिळवून राज्य गुणवत्ता यादीत आपले स्थान पटकावले. विद्यालयाचे 90% च्या वरती 19 तर 80 ते 90% च्या दरम्यान 43,आणि 70 ते 80 टक्के दरम्यान 51 व 60 ते 70 टक्के च्या दरम्यान 57 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा निकाल चांगला लागल्याने पालक शिक्षक विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे
शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी जयकुमार देसाई ,अध्यक्षा शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन डॉ. मंजिरी मोरे देसाई ,युवा नेते दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे, कौन्सिल मेंबर बाळ डेळेकर ,शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील, प्राचार्य एस. पी. पाटील ,उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी, पर्यवेक्षक एस. डी. साठे, उपप्राचार्य व्ही. जी. घोरपडे, तंत्र विभाग प्रमुख पी.बी लोकरे, वरिष्ठ लिपिक के.बी. वाघमोडे एम. एस. कांबळे यांचे प्रोत्साहन तर सर्व शिक्षक शिक्षकेतरांचे मार्गदर्शन लाभले.
*******************

