कॉक्रोच पार्टी. अगतिक झालेल्या बेरोजगार युवकांची दिशाभूल करून सत्तेची स्वप्ने पहाणारी पार्टी

Kolhapur news
By -

       



           


              कोल्हापूर न्यूज / वि रा. भोसले


 

        कोक्रोच पार्टी नावाच्या  सोशल मीडियावरील एका ग्रुप ने  लाखो फॉलोवर्स मिळवले आहेत अशी चर्चा सुरू आहे.या ग्रुप चे सूत्रधार तिघेजण आहेत. ते भारतीय असले तरी तिघेही परदेशात वास्तव्य करून रहातात.त्यांची नावे अशी. 

   1अभिजित दीपिके, बोस्टन, अमेरिका.

   2.ध्रुव राठी, जर्मनी 

   3.अप्रित शर्मा, ऑस्ट्रेलिया.


       या पैकी दीपिके हा केजरीवाल यांच्या आप पार्टीचा कार्यकर्ता आहे. सद्या कॉकरोच ग्रुप किंवा सी जे पी ग्रुप ब्लॉक केला असला तरी नव्या नावाने तो पुन्हा सुरू करण्यात आला आहे. त्यांचे फॉलोवर्स म्हणजे देशातील अगतिक झालेले बेरोजगार युवक होय. या युवकांना ते कॉकरोच म्हणतात. हा शब्द सुद्धा एका न्यायालयीन बाबी मधून पुढे आला.


वकिलीची बनावट प्रमाणपत्रे सादर करून सनद मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्याना उद्देशून सरन्यायाधीश म्हणाले हे परजीवी प्राणी आहेत. म्हणजे एखाद्या झुरळासारखे. बस्स, तेवढाच शब्द उचलून या केजरीवाल समर्थकांनी कॉकरोच जनता पार्टी नावाचा एक पक्ष तयार केला .ग्रुप तयार केला. त्यावर बँन आल्यावर नाव बदलून दुसरा पक्ष तयार केला. कॉकरोच जिवंत आहे (cockroach is back ) असे त्याला नाव दिले.या पक्षाचे संस्थापक हे परदेशी दहशत वाल्यांपेक्षा कमी नाहीत. परदेशात राहून देशातल्या बेरोजगार युवकांना भडकवायचे काम त्यांनी सुरू केले आहे. बेरोजगारी ही खरच फार मोठी राष्ट्रीय समस्या आहे. या समस्येचे मूळ म्हणजे वेगाने वाढणारी लोकसंख्या होय. 


जगात सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश म्हणजे भारत देश होय. भारताने चीनला सुद्धा यात मागे टाकले आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा सामना करणे हे फार मोठे आव्हान  भारत सरकार समोर आहे. त्यासाठी  सर्वत्र जोरदार प्रयत्न सुरूच चालू आहेत. परदेशातील उद्योग आणि तंत्रज्ञान भारतात आणने,आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत रोजगार निर्माण करणे  यासाठी अतोनात प्रयत्न सुरू आहेत.  जगातील प्रगत राष्ट्रांचे सहकार्य सुद्धा आपला देश घेत आहेत.शिवाय देशातही सर्व प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे. आपला देश अजुन विकसन शील देश आहे.. अद्यापही जपान जर्मनी सारखा तो पूर्ण विकसित झालेला नाही.


याचाच फायदा घेऊन शीश महालाची स्वप्ने पाहणाऱ्या कॉकरोच ग्रुपने अगतिक झालेल्या बेरोजगार युवकांना वेठीस धरले आहे. या लोकांनी स्वतःच्या राजकीय पक्षाचा अजेंडा सुद्धा तयार केला आहे. त्यात एक महत्वाचे कलम आहे. एस आय आर मध्ये मतदार अवैध ठरवला तर निवडणूक आयोग प्रमुखाला च अटक करायचे.

     म्हणजे ममता आणि केजरीवाल ज्यासाठी अकांड तांडव करत होते तेच पुन्हा आणायचे. पुन्हा बांगलादेशी आणि इतर घुसखोर आत आणायचे आणि त्यांच्या बोगस मतदानावर सत्ता मिळवायची.


  व्वा रे, राष्ट्र भक्ती.देशातील तमाम बेरोजगार युवा शक्तीला आवाहन आहे की देश अत्यन्त वेगाने विकसित होत आहे. बेरीजगारीचे जसे आव्हान आहे तसे इतरही जटील प्रश्न आहेत. शेजारच्या आणि दूरच्या शत्रूशी लढायची वेळ आली तर त्यासाठीची तयारी सुद्धा करावी लागेल. राष्ट्राची युवा शक्ती झुरळ नाही तर विकासाचा झंझावात आहे.स्वतःच्या पायावर युवकांना उभे करण्याचा अजेंडा केंद्रासह अनेक घटक राज्यांनी जाहीरही केला आहे.


    परदेशी पैशावर देशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याला एकच नाव देता येईल. कोक्रोच पार्टीचा भुलभूलया.



             ------------------------