कोल्हापूर न्यूज नेटवर्क
राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी शिक्षण मंत्री नाम .दादा भुसे यांच्यासमवेत बैठक आयोजित करून त्यांच्या मागण्या मार्गी लावणार असल्याचे आश्वासन कोकण विभागाचे शिक्षक आम . ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या शिष्टमंडळाला दिले . समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे आम .ज्ञानेश्वर म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना खाजगी शाळांच्या प्रश्नाबाबत निवेदन दिले व चर्चा केली .
यावेळी पुणे विभागाचे शिक्षक आम प्रा .जयंत असगावकर , कोल्हापूर विभागाच्या शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर सहाय्यक शिक्षण संचालक गणपतराव कमळकर व सांगली, सातारा रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील अधिकारी उपस्थित होते .
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी राज्यातील खाजगी प्राथमिक शाळांचे प्रलिंबत प्रश्न मांडले .या मध्ये प्रामुख्यांने मुख्याध्यापकांचा अर्जित रजेचे रोखीकरण, करणे , समायोजनांस स्थागिती असलेने शिक्षेकेतर कर्मचार्यांचे शिक्षण संचालक यांनी त्यांचे समायोजन थांबविणे,ज्या शिक्षकांची Nps व DCPS मध्ये प्रा फंड खाती नाहीत त्यांना 6 व्या व 7 व्या वेतन आयोगातील फरकाच्या रकमा रोखीने मिळणे,संच मान्यता दुरुस्ती व पदे शिफ्टिंग करणे साठी शिक्षण अधिकारी यांना टॅब उपलब्ध करून देणे ,शिक्षकांचे आभा कार्ड निघेपर्यंत त्यांची वैद्यकीय बिले पारित करणे ,90 पटअसलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचे पद संरक्षित करणे , अनुकंपा व न्यायालयीन निर्णयानुसार वैयक्तिक मान्यता दिलेल्या शिक्षकाला शालार्थ आयडी मिळणे ,जनगणना कामात सहभागी असलेल्या शिक्षकांना बदली रजा मिळणे .
31 मार्च 2026 रोजी पारित न झालेली थकीत बिले पारित होणे . खाजगी शाळांचे वेतनेतर अनुदान मिळणे अशा मागण्या वर चर्चा केली.
यावेळी बोलताना आम . ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षण मंत्री नाम .दादा भुसे यांच्याबरोबर बैठक आयोजित करूनहे प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासन दिले .
यावेळी राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या हस्ते आम . ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष आप्पासाहेब वागरे, जिल्हाध्यक्ष कुमार पाटील,विभागीय अध्यक्ष महादेव डावरे व मुख्याध्यापक संघाचे मा .सचिव दत्ता पाटील , विना अनुदानित कृती समितीचे बाबा पाटील , उर्दू शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष इरफान अन्सारी , मुख्याध्यापक संघ महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलवडे , सेनेचे सुनील जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते .
****************

