कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हेरले / प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानां अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मूल्यमापनात मौजे तासगाव (ता. हातकणंगले) या ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
रुकडी जिल्हा परिषद मतदार संघातील या गावाने प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावत डौलाने जिल्ह्यात नावलौकिक मिळवण्याचा निर्धार जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे यांच्यासह गावातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा आणि गावे स्वयंपूर्ण बनावीत या हेतूने शासनाने हे अभियान सुरू केले असून तालुक्यातील दोन गावांची जिल्हास्तरीय मूल्यमापनासाठी निवड झाली आहेत.यातील मौजे तासगाव हे रुकडी जिल्हा परिषद मतदार संघातील गाव असून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून कुठल्याही पद्धतीचा निधीची कमतरता भासू देणार नाही असे प्रतिपादन अतिश शिंगे यांनी यावेळी केले.
ज्येष्ठ नेते शिवाजी पाटील, सरपंच चंद्रकांत गुरव यांचे खासदार धैर्यशील माने यांनी या संदर्भात संपर्क करत अभिनंदन केले आहे. यावेळी सरपंच चंद्रकांत गुरव , ज्येष्ठ नेते शिवाजी पाटील , पंचायत समिती सदस्य सचिन जाधव , उपसरपंच सागर पाटील , ग्रामपंचायत अधिकारी आसिया पटेल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------

