कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हेरले / प्रतिनिधी : माणूस कितीही मोठा झाला तरी शालेय जिवनातील आठवणी आणि मित्र विसरता येत नाहीत . याचाच प्रत्यय मौजे वडगांव ( ता हातकणंगले) येथील इयत्ता १०वी च्या १९९१ -९२ बॅचमधील माजी विद्यार्थांनी तब्बल ३४ वर्षानंतर एकत्र येत आपल्या जुन्या आठवणींनां उजाळा दिला. जिव्हाळा, आपूलकी, आणि उत्साहाने नटलेला हा स्नेहमेळावा अत्यंत आनंदमयी वातावरणात संपन्न झाला .
या अभूतपूर्व स्नेह मेळाव्याची सुरुवात वृक्षारोपन व माता सरस्वतीच्या फोटो पुजनाने व दिप प्रज्वलाने झाली . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक एस .जी . पाटील होते. तब्बल ३४ वर्षानंतर आपल्या लाडक्या विद्यार्थांना समोर पाहून गुरुजनांचे डोळे कौतुकाने भरून आले होते. स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित शिक्षकांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थांना पुढील वाटचालीस मार्गदर्शन केले. यामध्ये एस.जी .पाटील ,एस ए चौगुले, आर. बी. पाटील ' आर.एस. स्वामी , व्ही. व्ही. झिरंगे , के. एन. पाटील , व्ही .एस . पाटील , यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
हा स्नेहमेळावा म्हणजे केवळ आठवणींचा संगम नव्हता तर नव्या मैत्रीची संगत , आपूलकीची साखळी आणि प्रेरणेचा प्रसार करणारा एक अनोखा अनुभव ठरला . या मेळाव्याला ४६ माजी विद्यार्थी उपस्थित होते . यावेळी विविध खेळ व गप्पांच्या फडानंतर सर्व मित्रांनी एकत्र स्नेह भोजनाचा अस्वाद घेतला . हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुबारक हजारी , अरुण पाटील , विलास काकडे ' सुरेश कांबरे , आण्णासो पाटील, रघुनाथ गोरड, जमीर पटेल, मधूकर सावंत , अनिता कोळी ,संगीता कांबरे ,अर्चना शेटे , यांनी मेहनत व परिश्रम घेतले .
स्वागत व प्रास्ताविक आण्णासो पाटील यांनी केले तर आभार सुरेश कांबरे यांनी मानले .
--------------------

