नानीबाई चिखलीत रंगला सामाजिक समतेचा जागर : भीमगीत गायिका भिमकन्या कडूबाई खरात यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Kolhapur news
By -




               





        



               कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


महाराष्ट्रातील प्रसिद्ध भीमगीत गायिका भिमकन्या कडूबाई खरात यांच्या प्रबोधनात्मक गायनाच्या कार्यक्रमास  चिखलीत  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक समता, बंधुता आणि परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या भीमगीतांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.


      नानीबाई चिखलीत गौतम बुध्द ,सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्य शिव शाहू फुले व आंबेडकर यांच्यावरील गायनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.



या प्रबोधनात्मक कार्यक्रमात  कडूबाई खरात यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित विविध भीमगीते सादर करत सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला.कार्यक्रमस्थळी जयभीमच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते. महिलांपासून युवकांपर्यंत सर्वच स्तरातील नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कडूबाई खरात यांच्या प्रभावी आवाजाने आणि ओजस्वी सादरीकरणाने उपस्थित श्रोते भारावून गेले.


   यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे, बिद्रीसाखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोजभाऊ फराकटे, जिल्हा परिषद सदस्या सौ. शिवानी ताई भोसले, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुवर्णा कांबळे, पंचायत समितीचे उपसभापती डॉ. इंद्रजीत पाटील, बाजार समितीचे सभापती नाना कांबळे, पंचायत समिती सदस्या सौ. सुवर्णा जाधव, बिद्री कारखान्याचे संचालक रंगराव पाटील, बिद्री कारखान्याचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, सदाशिव तुकान, विजयसिंह भोसले - पाटील, देवानंद पाटील, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी आर कांबळे, आरपीआयचे कागल तालुका अध्यक्ष चंद्रशेखर कोरे, अल्लाबक्ष सय्यद, राजेंद्र नुल्ले, जयंती समितीचे ओमाजी कांबळे, बाळासो घस्ती, विशाल चिखलीकर, दादासो चिखलीकर, युवराज जाधव, श्रीशैल नुल्ले, वाय टी पाटील, एस टी पाटील, आदीप्रमुख उपस्थित होते.


    ---------------------------------


      


       ७०० हून अधिक मंदिरे बांधणारे हसन मुश्रीफ जिहादी कसे ? 

आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांचा सवाल 

प्रकाश बेलवाडे याचा घेतला खरपूस समाचार    
        


कोल्हापूर जिल्हा ही लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. या भूमीत हिंदू धर्माच्या विविध देवदेवतांची ७०० हून अधिक मंदिरे बांधणारे मंत्री हसन मुश्रीफ जिहादी कसे? असा रोकडा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी केला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रकाश बेलवाडे याच्याकडून जर हा धर्मवाद, जातिवाद पेरला जात आहे. हे असले प्रकार चालू देणार नाही, असेही ते म्हणाले.
         
नानीबाई चिखली ता. कागल येथे आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात  कांबळे बोलत होते.
          
मंत्री  मुश्रीफ यांच्यावर सतत जातीयवादी आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या प्रकाश बेलवाडे याच्या जातीयवादी वक्तव्यांचा संदर्भ घेत श्री. कांबळे पुढे म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी सर्वधर्मसमभाव या न्यायाने राजकारण आणि समाजकारण केले. तुम्ही ज्यांना जिहादी म्हणता त्यांनी हिंदूंच्या विविध देवदेवतांची ७०० हून अधिक मंदिरे उभारली आहेत. मोठ्या भक्तीभावाने नतमस्तक होत सगळ्याच देव देवतांच्या पूजेलाही ते बसले आहेत. एवढ्या मोठ्या मनाचा आमदार आम्हा जनतेला लाभलेला असताना तुम्ही त्यांना जिहादी कसे म्हणता? अशा जातीयवादी विचारांच्या माध्यमातून संविधानच मोडून काढायचे काम होत असेल तर आपण स्वस्थ बसता कामा नये. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत वर्षाला दिलेले संविधान आणि महामानवांचे विचारच तुम्हा- आम्हाला तारणारे आहेत.

               
शिव, शाहू, फुले,आंबेडकरी विचारांना काळीमा... 


श्री. कांबळे पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.  बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर चालणारा जिल्हा आहे. या समतावादी जिल्ह्यात जाती- धर्माच्या नावाने कोणी विद्वेष पेरत असेल तर तो शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारांना काळीमा फासल्यासारखे आहे. काही अपप्रवृत्तींकडून या महापुरुषांच्या विचारांचा खून होत असेल तर हा जिल्हा कदापिही सहन करणार नाही. महामानवांचा विचार कलंकित होता कामा नये.



     ********************