दिल्लीमध्ये जंतर-मंतरवर वांगचुक यांचे आमरण उपोषण सुरू असतानाच त्यांना जबरदस्तीने दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल केले, दवाखान्यात ही वांगचुक यांचे उपोषण अजूनही सुरूच आहे. रविवारी त्यांच्या आंदोलनाचा २२ वा दिवस आहे. त्यांनी 'आयव्ही' (IV) सलाईन, ओआरएस (ORS) किंवा औषधे घेण्यास नकार दिला आहे.दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी त्यांना जंतरमंतरवरून हलवून सफदरजंग रुग्णालयात नेले होते.
यासाठी एक दोन उदाहरणे फारच महत्त्वाची आहेत.
लालबहादूर शास्त्री यांनी एका रेल्वे अपघाता नंतर आपल्या रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.शास्त्रीजींना देश एक आदर्श नेता मानतो.
दुसरे एक उदाहरण पाहू. ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांनी आपल्या राजकीय हितासाठी एक रेल्वे अपघात मुद्दाम घडवून आणला होता. आज ममतांची अवस्था काय आहे ? निस्वार्थ भावाने केलेले उपोषण किंवा आंदोलन यांचाही परिणाम पाहूया.
महात्मा गांधींच्या बद्दल एका कवीने सुंदर ओळ लिहिली आहे.
, "उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया."
गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहाची ताकद विशद करणारी ही ओळ आहे.
आता वांगचुक यांच्याकडे वळू.
कोण आहेत हे वांगच्छुक.?
ते एक स्वतः इंजिनियर आहेत आणि पर्यावरण तज्ञ आहेत. लडाख मधील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत. अशाच एका आंदोलनात शांततेचा भंग होतो म्हणून केंद्र सरकारने त्यांना अटक केली होती. पाकिस्तानी जिहादीशी त्यांचा संबंध आहे असा आरोप हे त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.तो सिद्ध झाला नाही.
तेच वांगचुक आता विद्यार्थ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आमरण उपोषण करत आहेत. अण्णा हजारे यांनी सुद्धा पंधरा दिवसांचे उपोषण दिल्लीत केले होते. त्या आंदोलनास प्रचंड प्रतिसाद देशभर मिळाला होता. केंद्र सरकारला निर्णय घेणे भाग पडले. वांगचुक हे अण्णा हजारेंच्या इतके प्रभावी नसले तरी त्यांच्या पाठीमागील विद्यार्थी ताकद फार महत्त्वाची आहे. Gen Z जनरेशन मधील संस्कृती भोसले नावाच्या एका विद्यार्थिनीने व्यक्त केलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.
"कोणत्याही राजकीय पक्षाशी आम्ही संबंधित नाही फक्त आमच्या भवितव्याबद्दल आम्हाला भीती वाटते.म्हणून शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी स्विकारून राजीनामा दिलाच पाहिजे.सरकारने परीक्षा पद्धत सशक्त केली तरच विदयार्थ्यांच्या अथक कष्टाला योग्य न्याय मिळेल.भवितव्याला एक सुरक्षा कवच मिळेल."
सोनम वांगच्छुक हेच म्हणतात.. त्यांचा उद्देश राजकीय नाही. देशभरातून त्यांना प्रतिसाद मिळत गेला तर त्यांचे उपोषण म्हणजे केंद्र सरकारच्या खुर्ची खालील बॉम्ब ठरेलं.बेदखल केले तर कोट्यावधी युवा विदयार्थ्यांचा विश्वासच उडेल. ते उद्याचे मतदार आहेत.
----------------------


