कागल येथील Ultrawin Agrochem / Uniqon Bio Fertilizers ला 'ऑरगॅनिक ॲग्रो मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन'च्या अध्यक्षांची सदिच्छा भेट

Kolhapur news
By -

 

           


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


कागल येथील Ultrawin Agrochem / Uniqon Bio Fertilizers या संस्थेच्या कार्यालयाला ऑरगॅनिक ॲग्रो मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष विजय ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली.



यावेळी त्यांनी कंपनीच्या आगामी प्रकल्पांची माहिती जाणून घेत सेंद्रिय शेतीच्या उज्ज्वल भविष्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. तसेच सेंद्रिय शेतीचा प्रसार, शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब, दर्जेदार सेंद्रिय उत्पादने आणि शेतकऱ्यांपर्यंत प्रभावी तंत्रज्ञान पोहोचविण्याबाबत मौल्यवान व दिशादर्शक मार्गदर्शन केले.



श्री. ठाकूर यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याचे कौतुक करत आगामी काळातही नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देण्याच्या शुभेच्छा दिल्या. या सदिच्छा भेटीदरम्यान परस्पर सहकार्य, संशोधन आणि सेंद्रिय शेतीच्या विकासासाठी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.



संस्थेच्या वतीने संचालक राम रानगे यांनी विजय ठाकूर यांचे स्वागत करून त्यांच्या भेटीबद्दल आभार व्यक्त केले. 



       -------------------------------