नवी दिल्ली : जंतर मंतर वरून सोनम वागच्छुक ना पोलिसांनी इस्पितळात हलवले. हायकोर्टाचे आदेश आहेत असे पोलिसांनी सांगितले. बरे झाले. कोणाचाही जीव अत्यंत महत्वाचा असतो. त्यांच्या उपोषणाचा हेतू स्वच्छ होता. NEET आणि शिक्षण मंत्री यांचा राजीनामा. या विषयावर कोणाचे दुमत असायचे कारण नाही.
जंतर मंतर मात्र राजकीय अड्डा बनला होता. NDA चे विरोधक असलेले INDIA आघाडीचे नेते एकेक करून जंतर मंतर वर येऊ लागले. अखिलेश यादव यांच्या पत्नी खासदार डिम्पल यादव, आप चे अरविंद केजरीवाल, उबा ठा च्या अंधारे, कांही काँग्रेस नेते. दक्षिण चे कांही विरोधक, सिने अभिनेते, तर कांही कॉमेडीयन.
NEET वर आता काय बोलणार? पुन्हा NEET परीक्षा सुरळीत झाली.तिचा निकाल सुद्धा जाहीर झाला.
जंतर मंतर वर मात्र वेगळेच चित्र होते.
एकजण आमरण उपोषण करतोय आणि बाकीचे पलीकडे बसून बिर्याणीवर ताव मारतात. कॉमेडी पण सुरु असते.
"सीता के पतीका नाम लेकर नीता के पती का काम करते है.
म्हणजे रामाचे नाव घेऊन अंबानी ना मदत करतात.टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी अशा अनेक कंपन्या आपल्या देशात आहेत. लाखो युवकांना देशातच नोकऱ्या मिळत आहेत.बुद्धिमान मुलांचा परदेशात जाण्याचा ओघ ओसरत चाललाय. देशात च त्यांना संधी मिळाली तर ते चांगले आहे. त्याचेही राजकारण सुरु आहे.
सत्ताधारी NDA सरकारवर टीका करायला धर्म मध्ये आणणे योग्य नाही. त्यासाठी दुसरे मुद्दे शोधा. इस्लाम वर टीका करायला जीभ धजत नाही कारण गळा कापला जाण्याची भीती वाटते.
प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असतो. डॉ. बावासाहेब आंबेडकरांच्या घटनेने प्रार्थनेचे स्वातंत्र्य सर्वांना दिले आहे. श्री राम तर राष्ट्रीय संस्कृतीचे प्रतिक आहे. संविधानाच्या पहिल्या पानावर धनुर्धारी श्री रामाचे चित्र आहे. संविधानची 128 वेळा मोडतोड करणारे लोकच संविधान बचाव म्हणून आज ओरड करत आहेत. याचे आश्चर्य वाटते. दक्षिण चा अभिनेता प्रकाश राज म्हणतो जय श्रीराम ऐवजी जय संविधान म्हणा.म्हणजे पुन्हा येरे माझ्या मागल्या.
ज्या आमिरखानने आपल्या चित्रपटातून हिंदू देव देवतांची टिंगल केली आणि आता निर्लज्ज पणे तीन तीन लग्ने केली त्याबद्दल बोला ना. श्रीरामावर का घसरता. श्रद्धा, भक्ती याला कांही मोल आहे की नाही? लाखो श्रद्धाळू वारकरी पंढरीची वाट चालत आहेत. विठ्ठल आणि श्रीराम दोन नाहीत.तरीही तिकडे तुम्हीं हिंदू च्या श्रद्धे वर कॉमेडी करताय. सरकार वर काय तुटून पडायचे ते पडा. धर्मश्रद्धे चे विडंबन करू नका.
वांगच्छुकना पाठिंबा जरूर द्या. त्यांच्या शेजारी बसून धर्मावर थुंकू नका. जंतर मंतर ने अनेक नेते घडवले पण धर्माची विडंबना होऊ दिली नाही.ही मर्यादा ओलांडायला नको होती.
प्रत्येकाच्या धर्म श्रद्धे चा आणि संविधानाचा सन्मान करावा.
--------------------

