कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून नानीबाई चिखली, ता. कागल येथे घरपती स्मार्ट प्रीपेड मिटर बसविणेची कार्यवाही सुरु असून सदर स्मार्ट प्रीपेड मिटर बसवणेस चिखली ग्रामस्थांचा व ग्राहकांचा कडाडून विरोध असुन सदर स्मार्ट प्रीपेट मिटर बाबत चिखली गावातील सर्व जनतेमध्ये प्रचंड असंतोष असुन सदर असंतोष व विरोधास डावलून महावितरण कंपनीकडून जबरदस्तीने स्मार्ट प्रीपेट मिटर बसवलेस जनउद्रेक भडकेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपकेंद्र लिंगनुर कापशी यांची राहील असा इशारा लिंगनूर कापशी येथील उपअभियंता यांना भिम ब्रिगेड संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
चिखली गावामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणेत येवू नयेत याकरीता ग्रामपंचायत चिखली कडून देखील महावितरणला रितसर लेखी कळविणेत आलेले आहे. तरी चिखली गावामध्ये कुठेही स्मार्ट प्रीपेट मीटर बसवणेत येवू नयेत अन्यथा भिम ब्रिगेड संघटनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर उग्र आंदोलन छेडणेत येईल असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यापूर्वीही निवेदन
भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने यापूर्वीही महावितरणला स्मार्ट मीटर बसू नये म्हणून निवेदन दिले होते पण त्याची महावितरण कडून दखल घेतली गेलेली नाही.
---------------------------


