कवयित्री नीता माळी यांच्या 'चैत्र मोही' या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा पोहाळे ता. पन्हाळा येथे संपन्न.

Kolhapur news
By -

 


                   



                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


 जोतिबाच्या पायथ्याला असलेल्या पोहाळे ता. पन्हाळा या गावच्या मध्य्यमिक शाळेची माजी विद्यार्थिनी कवयित्री नीता माळी यांच्या चैत्र मोही या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला.


   प्रकाशन सोहळ्यासाठी रोहित माने, संस्थेचे अध्यक्ष विश्वास काटकर, जेष्ठ साहित्यिक व कवी चंद्रकांत निकाडे, समर्थ रामदास समूहाचे अध्यक्ष नामदेव शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक आंबी,आदर्श शिक्षक सन्मानित शीघ्र कवी भारत माळी, इत्यादीं मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. 



नीता माळी यांचे मूळ गाव हेर्ले आहे. ग्रामीण आणि त्यातही डोंगराळ राहिलेल्या नीता माळी यांची काव्य प्रतिभा उत्तुंग आहे. त्यातही आपल्या मातृ शाळेत काव्य संग्रह प्रकाशित व्हावा ही भावना अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे.'अटळ ' कवितेत तर मानवी मृत्यूशी कविते च्या ओळीतून संवाद साधला आहे. 'कोरा कागद' या कवितेत निरपेक्ष प्रेम कसे व्यक्त होतं हे मांडले आहे. ""कोऱ्या कागदावर फक्त तुझेच नाव आहे "अशी भावनिक साद प्रियकराला किंवा प्रेयसीला घातली जाते..त्याला तोड नाही.'मी नदी होऊन ' या कवितेत सुद्धा नदीच्या रुपकातून निस्सीम प्रेम व्यक्त होते."तूझ्या मनातील भावनांचे आभाळ कोसळले तेंव्हा मी दुथडी वाहू लागते आणि मग समुद्रच होऊन जाते  " प्रेम आणि मिलन यांचे हे रुपक ताज आणि महाल (ताजमहाल )या प्रतिकांनाही मागे टाकेल असे आहे.



 ही काव्य गंगा जशी पुढे सरकेल तशी विशाल होत जाते पण तिचा उगम डोंगरात झाला आहे हे कौतुकास्पद आहे.त्यांचा चैत्र मोही हा पाहिला काव्य संग्रह असून त्यांचा यापुढचा कवसंग्रह लवकरच येईल असे संस्थेचे अध्यक्ष विश्वास काटकर यांनी सांगितले.


            ----------------------------