डॉल्बीमुक्त उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करा- डीवायएसपी आप्पासाहेब पवार यांचे आवाहन; मुरगूड परिसरातील ५७ गावांतील गणेश मंडळांची बैठक

Kolhapur news
By -

 


                           



                      कोल्हापूर न्यूज नेटवर्क



 अज्ञानतेतून किंवा अजानतेपणाने केलेल्या कोणत्याही कृत्याचा भविष्यात परिणाम होणार नाही, याची गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सजगपणे दक्षता घ्यावी. यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त तसेच समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करावा, असे आवाहन कागल विभागाचे डीवायएसपी आप्पासाहेब पवार यांनी केले.



मुरगूड येथे मुरगूडसह परिसरातील ५७ गावांतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुहासिनीदेवी पाटील होत्या.



पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुडले यांनी स्वागत केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी प्रास्ताविकात आगामी गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. बैठकीत सार्वजनिक मंडळांनी व्यासपीठाच्या परवानग्या तसेच उत्सवासंदर्भातील अन्य आवश्यक माहिती दिली. आभार पोलीस हवालदार प्रशांत गोजारे यांनी मानले.



यावेळी ओंकार पोतदार (मुरगूड), राजेश पाटील (म्हाकवे), सुनील पाटील (यमगे), नगरसेवक सम्राट मसवेकर, माजी नगरसेवक सुनील रणदिवे, माजी प्राचार्य महादेव कानकेकर यांनी मनोगत व्यक्त केले.



यावेळी सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते ओंकार पोतदार, सर्पमित्र रघुनाथ बोडके, निलेश विलास पाटील, पोलीस पाटील बेनिक्रे, दूधसाखर विद्यानिकेतनचे वृक्षमित्र आर. के. पाटील, धनाजी वायदंडे, अशोकसिंह अमोलसिंह काईत, होमगार्ड सनद क्रमांक १३१४ कृष्णात रामचंद्र भुते तसेच श्रीराम मंगल कार्यालय, मुरगूड यांचा सत्कार करण्यात आला.



यावेळी मुख्याधिकारी अतिश वाळुंज, उपनगराध्यक्ष रेखाताई मांगले, महादेव कानकेकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष कृष्णात कुरणे, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


              ------------------------