कोल्हापूर न्यूज नेटवर्क
लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान पुणे, यांच्यातर्फे "पाली-मराठी" भाषेचे पहिले शब्दकोशकार लोकशिक्षक बाबा भारती यांच्या नावाने प्रतिष्ठित असा "लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिभा पुरस्कार" देण्यात येतो. यावर्षीच्या २०२६ च्या २८ व्या पुरस्काराचे मानकरी सीमा भागातील परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. एन.डी. जत्राटकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल ते मानकरी ठरले आहेत.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल निपाणी फाउंडेशनच्या वतीने डॉ. एन डी जत्राटकर सर यांचा सत्कार प्रशांत गुंडे दत्तात्रय खोत प्रा. नानासाहेब जामदार , उपप्राचार्य आर के दिवाकर , जयराम मिरजकर, विठ्ठल वाघमोडे, सुधाकर माने, डी बी शिरगुप्पे इ. मान्यवरांचे हस्ते मंगळवार दिनांक 25 रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ.एन डी जत्राटकर यांनी सांगितले की" आपण आजपर्यंत जे निरपेक्षपणे समाजसेवेचे काम केले आहे.त्याची दखल घेऊन हा पुरस्कार मला मिळाला. याचे सर्व श्रेय सीमा भागातील समस्त जनतेला आहे " असे सांगून हा पुरस्कारही सीमा भागातील जनतेला मी अर्पण करतो. असे ही सांगितले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी भाषा संवर्धनात मैलाचा दगड ठरलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचे वयाच्या 102 व्या वर्षी, कालच त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी आयुष्यभर मराठी भाषा व त्याचे व्याकरण याच्या संवर्धनासाठी काम केले. त्यांना यावेळी निपाणी फाउंडेशनच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रा.यास्मिन शेख यांच्या मराठी संवर्धनाच्या कार्याविषयी प्रा. नानासाहेब जामदार यांनी त्यांच्या जीवन कार्याचा व मराठी भाषा व्याकरण संशोधनाचा सविस्तर आढावा घेतला.
या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमानंतर डॉ. एन डी जत्राटकर यांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा प्रा. नानासाहेब जामदार , प्रा. एन आय खोत, उपप्राचार्य आर के दिवाकर, विठ्ठल वाघमोडे, जयराम मिरजकर, दत्तात्रय खोत , डी बी शिरगुप्पे, सुधाकर माने यांनी व अध्यक्षीय मनोगत फाउंडेशन चे अध्यक्ष प्रशांत गुंडे यांनी व्यक्त केले. यावेळी विश्वनाथ किल्लेदार,फोर जे आर ह्यूमन राइट्स चे अशोक खांडेकर, सौ राजश्री चव्हाण, आवटे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत साहित्यिक प्रमोद कांबळे यांनी ,तर पाहुण्यांची ओळख व आभार बाबासाहेब मगदूम यांनी मानले.
लोकशिक्षक बाबा भारतीय शिक्षक प्रतिभा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर एन डी जत्राटकर यांचा निपाणी फाउंडेशन निपाणी तर्फे सत्कार करताना डावीकडून उजवीकडे अनुक्रमे जयराम मिरजकर, अशोक खांडेकर, विठ्ठल वाघमोडे, प्रमोद कांबळे, सौ राजश्री चव्हाण, प्रा नानासाहेब जामदार, बाबासाहेब मगदूम, हिंडी जत्राटकर, प्रा. एन आय खोत, दत्तात्रय खोत, फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत गुंडे, सुधाकर माने, प्राचार्य दिवाकर, डी बी शिरगुप्पे इत्यादी
---------------------------------


